Mandar's World

Expression of Heart, Soul and Brain

Yes, I saw “Raavan”!!!

 

तिर्थस्वरुप मणिरत्नम अण्णा यांस,
साष्टांग नमस्कार…

विषय: रावण चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे माघारी मिळणेबाबत..

बरेच दिवस झाले पत्र लिहले नाही…
कालच तुमचा रावण चित्रपट पाहिला.. पाहुन अतिशय दु:ख झाले…
चित्रपट वाईट आहे याचे दु:ख नाही…तुमच्या नावावर आम्ही १०० रुपये वाया घालवले याचे दु:ख झाले…
मला फोनवर मित्र आवर्जुन म्हणाला होता ..” अरे, पिक्चर नका बघु..चांगला नाही..”
पण तुमचा पिक्चर आहे म्हणुन आम्ही गेलो होतो…

पहिला तासभर आम्हाला कळालेपण नाही, आम्ही पिक्चर पाहतोय की डिस्कवरी चँनेल पाह्तोय..नुसतेच जंगल आणि ओढेनाले..

आमच्या मित्रांचा एक निरोप आहे…
प्लिज आता अभिषेक काकांना आणि ऐश्वर्याकाकुंना भुमिका देणे बंद करा…
खाण्यापिण्याचे लाड ठिक पण असले लाड काय कामाचे..
त्यांनी तुमच्या पैशात दुसरा हनिमुन केला…आणि तुम्ही बसला कँमेरा सांभाळत…
आता कँमेरा जाऊन हाती कटोरा नाही आला म्हणजे कमावले…
थोडा विचार करत चला..

आमच्या सारखे नोकरी करणाऱ्या गरीब लोकांना चांगले वाटतील, पचनी पडतील असे काही चित्रपट बनवा…
हे पुणे आहे इथे चांगले तेच चालते..

एक मात्र त्या रेहमान भाऊना आठवणीने सांगा..पिक्चर चांगला नाही..पण म्युझिक एकदम मस्त आहे

कळावे, लोभ असावा… नाही नाही चुकले… या पुढे कोणताही लोभ नसावा,

— (नाईलाजास्तव)
आपला नम्र,
Puneri Punekar
पुणे

Tags: ,
posted by Mandar in Fun - Masti,Misc and have No Comments

Superman

या कवितेचा विशेष म्हणजे तीन कडवी तीन वेगवेगळ्या रसांमधली आहेत ‍‍ (वीर रस, करूण रस व भक्ती रस)
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन
वरतून चड्डी आतून पँट
अंगामध्ये ताकद फार, पोलादाची जणू पहार
पक्षी नाही तरी उडतो, मासा नाही तरी बुडतो
उडण्याचाही भलता वेग, पँरीस पनवेल सेकंद एक
रोज पृथ्वीला चकरा पाच, गेला म्हणता हा आलाच
गरुडाहूनही थेट नजर, जिथे संकटे तिथे हजर
कोसळती बस हा अडवी, फुंकरीत वणवा विझवी
अंतराळीचे व्हिलन कुणी, त्यांच्याशी दण्णादण्णी
अवघी दुनिया त्याची फँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन
जरी जगाहून भिन्न असे, तरी मनातून खिन्न असे
आदर करती सर्व जरी परी न कोणी मित्र तरी
लांबून कौतुक हे नुसते, कुणी न मजला हे पुसते
जेवण झाले काय तुझे, काय गड्या हे हाल तुझे
दिवस रात्र हे तू दमशी, सांग तरी मग कधी निजशी
उडता उडता असे सुसाट, दुखते का रे मधेच पाठ
एकएकटे फिरताना, विचार करतो उडताना
आत रिकामे का वाटे, कसे वाटते सर्व थिटे
अंगी ताकद जरी अफाट, काय नेमके सलते आत
करुन बसला तोंड लहाऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन
असा एकदा एक दिशी उंच हिमाच्या शिखराशी
बसला असता लावून ध्यान त्यास भेटला मग हनुमान
काय तयाचे रूप दिसे सुर्याचे प्रतिबिंब जसे
शक्ती ही अन् युक्ती ही, तरी अंतरी भक्ती ही
आणि बोलले मग हनुमान….
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
रोनी सी ये सूरत क्यूँ? मित्रा I am proud of you!!
सर्वाहून आगळाच तू, जैसा मी रे तैसा तू
ऐक एवढे ते अवधान, शक्ती युक्ती चे हे वरदान
त्या रामाने दिले तुला, त्याने बनवले तुला मला
त्या रामास्तव करणे काम, त्या रामास्तव गळू दे घाम
साथ जरी ना कुणी असे, आत तुझ्या पण राम असे
राम राम हे म्हणत रहा, आणि जगाला भिडत रहा
त्या रामाचे करूनी ध्यान, चिरंजीव भव सुपरमँऽऽऽऽऽन
चिरंजीव भव …सुपरमँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान
Tags: , , , , ,
posted by Mandar in Fun - Masti,Misc and have No Comments